आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या पूरात 8 जणांचा मृत्यू, तर 12 जण बेपत्ता!

WhatsApp Group

आंध्र प्रदेश – अवकाळी पडेलेल्या मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशमधील रायलसीमाच्या तीन जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशामध्ये कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे तेथील रस्त्यांना नद्यांच रूप आलं आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. या अवकाळी पावसामुळे स्थानिक नागरिकांची पूर्ती वाताहात झाली असून त्यांच्यावर मोठं संकट कोसळंल आहे.

वाहून गेलेल्या 20 लोकांपैकी 8 जणांचे मृतदेह मिळाले

मुसळधार पाऊस आणि अन्नमयी धरण फुटल्याने 20 गावकरी पुरात वाहून गेले होते. या वाहून गेलेल्या 20 लोकांपैकी 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 12 लोक अजूनही बेपत्ता आहेत, अशी धक्कादायक माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर पूरात अडकलेल्या काही लोकांना वाचवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आह, तर बेपत्ता असेलेल्या नागरिकांचे शोधकार्य अजूनही सुरू आहे.

मुख्यमंत्री करणार पूरग्रस्त भागांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. मोदींनी आंध्र प्रदेशमधील पूरस्थितीचा आढावा घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आज पूरग्रस्त भागांचा दौरा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.

रस्त्यांना आले नदीचे स्वरुप

आंध्र प्रदेशमध्ये कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. काही गावे पाण्याने पूर्णपणे वेढली गेली आहेत. रस्त्यांवर नद्यांचे पानी आल्याने काही भागात रस्तेही वाहून गेले असून रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

या भयानक पूरामुळे खबरदारी म्हणून पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा देखील बंद ठेवण्यात आला आहे. अचानक आलेल्या या पूरामुळे काही लोक पाण्यात वाहून गेले आहेत. तर 12 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाकडून आंध्र प्रदेशात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.