श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटली, 4 मुलांचा मृत्यू, 12 जण अद्याप बेपत्ता

0
WhatsApp Group

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे झेलम नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवारी श्रीनगरच्या बाहेरील झेलम नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेलम नदीचे पाणी जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.