
मुंबई – खासदार नवनीत राणा यांचा मुंबईतील लीलावती रुग्णालयात सिटी स्कॅन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी बीएमसीच्या एच वेस्ट वॉर्डने लीलावती हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर लीलावती रुग्णालयाला आता उत्तर द्यावे लागणार आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन एमआरआय प्रक्रियेतून जात असलेले खासदार नवनीत राणा यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कसे पसरवले गेले, असा सवाल व्यवस्थापनाला केला.
लीलावती रुग्णालयाचे CEO डॉ रविशंकर यांनी सोमवारी सांगितले की, आम्हाला रविवारी बीएमसीकडून नोटीस मिळाली आणि उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. निवेदने गोळा करून समिती स्थापन करत आहोत. आम्ही निर्धारित वेळेपूर्वी उत्तर देऊ असं ते म्हणाले आहेत.