
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांचे अर्ज फेटाळले असून दसरा मेळाव्यासाठी कोणत्याही गटाला परवानगी देण्यात आली नाहीय. कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचा अर्ज बीएमसीने फेटाळला आहे. मुंबई हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे त्याच दिवशी बीएमसीचा हा निर्णय आला आहे.
मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा निर्णय हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.