मुंबई – मुंबई महापालिकेकडून आता मुंबईतील सर्व शाळांना मराठीतून नाव सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत बीएमसीच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबईतील प्रत्येक शाळेबाहेर आठ बाय तीन फूटाच्या बोर्डावर शाळेचे नाव मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीत लिहावे असं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.
मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर आणि प्रसार होण्यासाठी मुंबई मनपाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक आता मराठीमध्ये लावावे लागणार आहेत.
राज्य सरकारकडून राज्यातील सर्व आस्थापने आणि दुकानांचे फलक मराठीमध्ये करण्याचे अनिवार्य केल्यानंतर आता मुंबई मनपाने शाळांच्या नामफलकाचा मुद्दा उपस्थित करत शाळांच्या इंग्रजीतील नामफलांना विरोध करत शाळांची नावे मराठीमध्येचं लिहीली जावीत असा निर्णय घेतला आहे.
युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाकडे मागणी करत मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीमध्ये व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता सर्व महाविद्यालयांचे नाम फलक मराठीमध्ये करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook