
ट्विटरने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या खात्यांवरील ब्लू टिक काढून टाकले आहे. या दोन दिग्गज नेत्यांच्या नावासमोर निळ्याऐवजी ग्रे टिक्स दिसू लागल्या आहेत. ट्विटरचे मालक झाल्यापासून इलॉन मस्क त्यात अनेक बदल करत आहेत. त्यांनी ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय लोकांच्या नावासमोर दिसणारी टिक देखील तीन रंगात दिली जात आहे. पूर्वी फक्त ब्लू टिक दिली जात होती. या बदलांतर्गत पीएम मोदींच्या खात्यातून ब्लू टिक काढून ग्रे टिक देण्यात आली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्या खात्यातूनही ब्लू टिक काढण्यात आली आहे. आता त्यांच्या नावापुढे ग्रे कलरची टिक दिसत आहे. ग्रे टिक फक्त सरकारशी संबंधित लोकांनाच देण्यात येणार असल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे. पण, सध्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ग्रे टिक देण्यात आलेली नाही.