INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, तीन जवान शहीद

WhatsApp Group

मुंबई – आयएनएस रणवीर या युद्धनौकेत स्फोट झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरा आयएनएस रणवीरमध्ये झालेल्या स्फोटात भारतीय नौदलाचे तीन जवान शहीद झाले आहेत INS Ranvir explosion . तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्फोटाबाबत माहिती देताना भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, INS रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परतणार होते. या दरम्यान युद्धनौका आयएनएस रणवीरमध्ये स्फोट झाला. या स्फोटात तीन जवान शहीद झाले मात्र जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.


आयएनएस रणवीरमध्ये स्फोट कसा झाला याची चौकशी करण्यासाठी बोर्ड ऑफ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. INS रणवीर ही युद्धनौका ऑक्टोबर 1986 मध्ये ते नौदलात सामील झाली होती.