न्यूझीलंडला बसला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू विश्वचषकातून बाहेर

WhatsApp Group

दुबई – न्यूझीलंड क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे फर्ग्युसन या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. लॉकीच्या जागी आता न्यूझीलंड संघात अ‍ॅडम मिल्नेला पाचारण करण्यात आले आहे. मात्र त्याला संघात खेळवण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट व्यवस्थापनाला आयसीसीची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

पुढच्या 13 दिवसांत न्यूझीलंडचा संघ 5 सामने खेळणार आहे, न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की फर्ग्युसनला टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर काढण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. ‘सुपर 12 फेरीच्या पहिल्या सामन्याच्या काही तास आधी हे असं घडणं लॉकी फर्ग्युसनसाठी खूप वेदनादायक होतं असं गॅरी स्टीड म्हणाले.


फर्ग्युसनला हा न्यूझीलंडच्या टी20 संघातील एक महत्वाचा खेळाडू असून तो सध्या खूप चांगल्या लयीत आहे. त्यामुळे तो संघात नसणे हे न्यूझीलंडसाठी खूप धक्कादायक आहे. फर्ग्युसनच्या जागी संघात आलेला अ‍ॅडम मिल्ने अगोदरपासूनच UAE मध्ये आहे. मात्र आयसीसीची मंजुरी मिळेपर्यंत तो न्यूझीलंड संघात खेळू शकणार नाहीय. या कारणानेच तो शारजाह येथे होणार न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्याला मुकणार आहे.

न्यूझीलंड संघाचा ‘सुपर 12 फेरीतील पहिला सामना भारताला 10 विकेट्सने हरवणाऱ्या बलाढ्य पाकिस्तान संघाशी होणार आहे. आत्मविश्वासाने भरलेल्या पाकला हरवण्याचं मोठं आव्हान न्यूझीलंडसमोर असणार आहे. लॉकी फर्ग्युसन सारखा टी20 तील अनुभवी खेळाडू संघात नसल्याने न्यूझीलंडला खूप मोठं नुकसान होणार आहे.

टी२० विश्वचषकासाठी आता असा असेल न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, डेवन कॉन्वे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट, मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जेमिसन, अ‍ॅडम मिल्ने, मार्क चेपमॅन आणि टॉड एस्टल.