ओडिशात आढळला दुर्मिळ काळा वाघ, पहा Video

WhatsApp Group

Black Tiger Spotted In Odisha: दुर्मिळ वाघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सुद्धा असा वाघ क्वचितच याआधी पाहिला असेल. हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे.

IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर काळ्या रंगाच्या ‘अत्यंत दुर्मिळ’ वाघाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ओडिशा व्याघ्र प्रकल्पात हा वाघ दिसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा वाघ आपल्या भागात खुणावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काळे वाघ दिसल्याचा दावा 1773 पासून केला जात आहे. म्यानमारमध्ये 1913 मध्ये आणि चीनमध्ये 1950 मध्ये असेच दावे करण्यात आले होते. जप्त केलेली काळी वाघाची कातडी 1993 मध्ये नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री दिल्ली येथे प्रदर्शित करण्यात आली होती.

व्हिडिओ होतोय व्हायरल

IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 29 जुलै रोजी शेअर करण्यात आला होता, जो आतापर्यंत 35 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 2,400 हून अधिक युजर्सनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे. युजर्स व्हिडीओवर स्वतःचा फीडबॅकही देत ​​आहेत.