पुण्यातील मटका किंग खून प्रकरणात BJP कनेक्शन आलं समोर; मोठ्या पदाधिकाऱ्याला अटक

WhatsApp Group

शिरवळ – काही दिवसांपूर्वी पुण्यामधील Pune मटका व्यावसायिकाची खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. येथील एका इमारतीच्या टेरेसवर काही अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडून खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे.

पण या हत्येचा मास्टरमाइंड भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. शिरवळ पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.

अमोल बंडोपंत हुलावळे असे अटक केलेल्या 36 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपी हुलावळे हा पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरामधला रहिवासी आहे.आरोपी हुलावळे हा भाजपच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचा पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे.