ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

WhatsApp Group

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मात्र जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. या दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यावेळी दोन समुहांकडून दगडफेक देखील करण्यात आली. या घटनेत एक भाजपचा कार्यकर्त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

पोलीसांनी सुमारे 20-25 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

राज्‍यासह जळगाव जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे. या दरम्‍यान जामनेर तालुक्‍यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावामध्ये प्रवेश केला तेव्हा पराभुत झालेल्या विरोधकांकडुन तुफान दगडफेक करण्यात आली.

Gram Panchayat Election Results: शिरशिंगे गावात भाजपचा झेंडा, सरपंचपदी दिपक राऊळ यांची निवड