कर्नाटक CID ची धडक कारवाई: PSI भरती घोटाळ्यात भाजपच्या महिला नेत्याला पुण्यातून अटक

WhatsApp Group

पुणे – कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) शुक्रवारी भाजप नेत्या दिव्या हागारगीला (BJP leader Divya Hagargi) अटक करण्यात आली आहे. सीआयडीने पुण्यातून (Pune) ही अटक केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या ही पुण्यात लपून होती. आज सकाळी त्यांना कलबुर्गी येथे आणलं जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक झालेली ती 18 वी आरोपी आहे.

दिव्याचा पती राजेश हगारगी याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे तर त्यावेळी ती पळून जाण्यात यशस्वी झाली होती. गुलबर्गा इथल्या कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. त्याआधी आरोपींनी अटपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.