“नवाब मलिक कौन है…दाऊद का दलाल है…”
मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी “नवाब मलिक कौन है…दाऊद का दलाल है…” अशा घोषणा देत आज भाजपच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन नवाब मलिक यांच्या राजिनाम्याची जोरदार मागणी केली आहे BJP demand for Nawab Malik resignation. नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप असून याच प्रकरणात त्यांना अटक झाली आहे.
First time in the history of Maharashtra, a Cabinet Minister is in jail & not resigning,nor is the MVA Government taking his resignation.
Allegations are serious!
Financial transactions with the killers of Mumbai,Dawood Ibrahim❗
₹55 lakh transferred to his sister Haseena Parkar pic.twitter.com/n7bk1QLIbx— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 3, 2022
तर दुसरीकडे आज महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्यांदा ED कोठडी मिळाल्याने भाजप आता नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आणखी आक्रमक होणार हे नक्की.