भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला, पोलीसांकडून शोध सुरू

WhatsApp Group

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने जेपी नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार सर्व्हिससाठी घेतली होती. 19  मार्च रोजी त्यांची कार सर्व्हिस सेंटरमधूनच चोरीला गेली होती. चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी आता कारचा शोध सुरू केला आहे.

दिल्ली पोलिसांना दिलेल्या अहवालात ड्रायव्हरने म्हटले आहे की, कारचा नोंदणी क्रमांक HP03D0021 अरोरा प्रॉपर्टीज आरडी मार्गासमोरील गोविंदपुरी येथून चोरीला गेला आहे. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान कार चोरीला गेल्याची शक्यता असल्याचे चालकाने सांगितले. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये दर 14 मिनिटांनी एक वाहन चोरीला जाते. JP Nadda Wife Car Stolen