
MCD Result: दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. आपच्या 134 उमेदवारांनी विजयाची नोंद केली आहे. भारतीय जनता पक्षाने 104 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसनेही नऊ जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी अपक्ष उमेदवारांनी तीन जागा काबीज केल्या आहेत.
एमसीडीमध्ये आपच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले – दिल्लीच्या जनतेने दिल्ली स्वच्छ करण्याची आणि भ्रष्टाचार संपवण्याची जबाबदारी आपल्या मुलावर आणि भावावर दिली आहे. केंद्र सरकारचेही सहकार्य हवे आहे. पंतप्रधानांच्या आशीर्वादाचीही गरज आहे.
इतनी बड़ी जीत देने के लिए Delhi की जनता को बहुत-बहुत बधाई है
पहले School-Hospital, बिजली की ज़िम्मेदारी दी, हमने वो ठीक किए
अब दिल्ली की जनता ने अपने बेटे को सफ़ाई करने,Parks ठीक करने की ज़िम्मेदारी दी है। मैं Delhi की जनता का ऋणी रहूंगा
-CM @ArvindKejriwal #MCDMeinBhiKejriwal pic.twitter.com/Ffvl8fx0Yp
— AAP (@AamAadmiParty) December 7, 2022
विजयाबद्दल बोलताना पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सिंह म्हणाले- अरविंद केजरीवाल कट्टर प्रामाणिक आहेत, लोकांनी प्रामाणिकांना विजय मिळवून दिला आहे. भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचे काम केजरीवाल यांनी केले. भाजप हा पोकळ पक्ष आहे. असं ते म्हणाले आहेत.