
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय भूकंप आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे २९ आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर येत आहे. एकनाथ शिंदे सध्या आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. अशात आता भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. तिन्ही जिल्ह्यातील बहुतांश आमदार, खासदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पडण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ठाण्याला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.