भाजप खासदारचं महिला आमदाराशी गैरवर्तन, आधी हात पकडला, मग…’तो’ VIDEO व्हायरल

WhatsApp Group

यूपीच्या अलीगढमधील भाजपच्या कार्यक्रमाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ अलीगडचे खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा बसले आहेत. व्हिडिओमध्ये खासदार महिलेसोबत मस्करी करताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे सतीश गौतम चर्चेत आले आहेत. व्हिडीओमध्ये सतीश गौतम यांचं वर्तन आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

यावेळी सतीश गौतम यांनी मुक्ता राजा यांचा आणि हात पकडला मग, खांदा दाबल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही घटना उपस्थितांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. खासदाराच्या या कृत्याचा व्हिडिओ कोणाच्यातरी मोबाईलमध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खासदार सतीश गौतम यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्याशी आपले आई-मुलाचे नाते असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर ज्याप्रकारे या नात्याचे चित्रण करण्यात आले ते पाहून मला वाईट वाटले. खासदार-आमदारांच्या या व्हिडिओवर भाजपच्या अनेक नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पहा व्हिडिओ