कणकवली – न्यायालयाने आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा दिला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे nitesh rane sent to judicial custody
जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयानंतर नितेश राणे हे जामिनासाठी आता सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत. त्यामुळे त्यांना जामिन मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमदार नितेश राणे २ फेब्रुवारीला कणकवली न्यायालयात शरण आले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची म्हणजे ४ फेब्रुवारी (आजपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
नितेश राणे यांच्याविरुद्धचा हा खटला गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरणाशी संबंधित आहे, तक्रारदार, 44 वर्षीय संतोष परब यांनी दावा केला आहे की त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली होती.
संतोष परब यांनी आरोप केला होती की कारमधील प्रवाशांनी आपल्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी एकाने दुसर्या व्यक्तीला “गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना माहिती द्यावी” असे सांगताना ऐकले असल्याचे सांगितले होते.