भाजप आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

WhatsApp Group

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिन्यात शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे BJP MLA Nitesh Rane moves Supreme Court.

संतोष परब हल्लाप्रकरणात सत्र आणि उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात नितेश राणे यांची केस ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.


नितेश राणे यांच्याविरुद्धचा खटला गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरणाशी संबंधित आहे, तक्रारदार, 44 वर्षीय संतोष परब यांनी दावा केला आहे की त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली होती. परब यांनी आरोप केला की कारमधील प्रवाशांनी आपल्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी एकाने दुसर्‍या व्यक्तीला “गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना माहिती द्यावी” असे सांगताना ऐकले.

या सर्व प्रकरणावरुन शिवसेना आक्रमक झाली होती. नितेश राणेंना अटक करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. नितेश यांना धडा शिकवला जाईल, असेही शिवसेना नेत्यांनी सांगितले होते.