भाजप आमदार नितेश राणेंबद्दल न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय!

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणेंना Nitesh Narayan Rane मोठा दिलासा दिला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 30 हजाराच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हिजाबवरून वाद वाढला; कर्नाटकात 3 दिवस शाळा बंद, हायकोर्टात आज होणार सुनावणी

सिंधुदुर्ग Sindhudurga जिल्ह्यात झालेल्या संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे यांना यापूर्वी सत्र, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर नितेश राणे २ फेब्रुवारीला कणकवली न्यायालयात शरण आले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची म्हणजे ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र त्यांनंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आणि अजेर अखेर त्यांना जामीन मिळाला आहे.


नितेश राणे यांच्याविरुद्धचा हा खटला गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरणाशी संबंधित होता. तक्रारदार, 44 वर्षीय संतोष परब यांनी दावा केला आहे की त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली होती.

पुण्यातून लाइट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत

संतोष परब यांनी आरोप केला होती की “कारमधील प्रवाशांनी आपल्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी एकाने दुसर्‍या व्यक्तीला “गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना माहिती द्यावी” असे सांगताना ऐकले असल्याचे संतोष परब यांनी सांगितले होते.”