“राणे परिवाराकडून अंतर्गत खच्चीकरण…’ राणेंवर आरोप करत राजन तेलींनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा, ठाकरे गटात प्रवेश करणार
सावंतवाडी : भाजपा नेते राजन तेलींनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यातून दीपक केसरकर आणि नारायण राणेंवर हल्लाबोल केलाय. मतदारसंघात चालत असलेली घराणेशाही मान्य नाही. राणे परिवाराकडून अंतर्गत खच्चीकरण होत असल्याचा आरोप देखील राजन तेलींनी केला आहे. दरम्यान राजन तेली सावंतवाडी मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असून ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश तर सावंतवाडी मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल.