पवार साहेब इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं – निलेश राणे

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार आहेत, तरी ते बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येवर बोलतात. मग इतके वर्षे काय केलं?” असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष, तरी शरद पवार बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरेवर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं, तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं.”


मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही म्हणून शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा MRI मशीन मध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले, हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे. असं म्हणत निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.