Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा वाद राज्यात पेटला आहे. मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सतत करत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सध्या तरी राज्य सरकारकडू दुर्लक्ष करण्यात येतंय. दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
“मराठा हा कुणबी नाही. मराठ्याला कुणबी बोलून घेणं आवडणार नाही. कुणबींचे आरक्षण मराठ्यांना नको”, असं स्पष्ट मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.
कोकणात कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत. त्यामुळं कुणीही मराठा स्वत:ला कुणबी म्हणून घेणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण नको, असं राणे म्हणालेत.