
भाजपाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तातडीने पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःला गोळी झाडली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना लगेच शहरातील फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.
शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच खा.प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रूग्णालयात दाखल झाले आहेत. रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. आत्महत्या करण्या मागचे कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.