‘करेक्ट कार्यक्रम…अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणार्यांना दणदणीत उत्तर’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला !

WhatsApp Group

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपला महाविकास आघाडीची ९ मतं मिळवण्यात मोठ यश आलं . देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे. यानंतर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना नेहमी “अकेला देवेंद्र क्या करेगा” असं म्हणायचे. याला आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “करेक्ट कार्यक्रम…. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर” असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयामुळे भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत.

तर दुसरीकडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.