राज्यात बर्ड फ्लूचा उद्रेक, हजारो कोंबड्या मारण्याचे आदेश

WhatsApp Group

मुंबई: राज्य सरकारने गुरुवारी राज्यात बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याची पुष्टी केली आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यामधील एका फार्ममध्ये H5N1 एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरसची (H5N1) लागण झाली असून अनेक कुक्कुट पक्ष्यांचा यात मृत्यू झाला आहे Bird flu cases detected in Maharashtra .

मात्र, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं आवाहन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. दरम्यान आता हजारो कोंबड्या मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे केरळमधील एका गावामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यामधील शाहपूर तालुक्यामध्ये सुमारे २०० कुक्कुट पक्षी फार्ममध्ये होते. ज्यात 2, 5 आणि 10 फेब्रुवारी रोजी काही जणांचा मृत्यू झाला, मात्र फार्मने सुरुवातीला प्रशासनाला याबाबतची माहिती दिली नाही. त्यानंतर10 फेब्रुवारीला कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्यानंतर, 11 आणि 13 फेब्रुवारी रोजी नमुने गोळा करून पुण्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या रोग तपासणी विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. येथे नमुने भोपाळ मधील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थेकडेही पाठविण्यात आले आहेत.