Bipasha Basu होणार आई, फोटो शेअर करत दिली गूड न्यूज!

WhatsApp Group

Bipasha Basu आणि Karan Singh Grover लवकरच होणार आई-बाबा होणार आहेत. आज अभिनेत्री बिपाशाने खास फोटो शेअर करत ही गूड न्यूज शेअर केली आहे. फोटोसोबत तिने एक भावनिक पोस्ट देखील लिहली आहे. हे बिपाशा आणि करण यांचे पहिलं बाळ आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे बेबी बंप असलेले फोटो शेअर करून गरोदरपणाच्या बातमीची पुष्टी केली. या फोटोंमध्ये बिपाशा बेबी बंप करताना दिसत आहे, तर पती करणही एकत्र पोज देताना दिसत आहे. दोघांचे फोटो चाहत्यांना खूप आवडत असून त्यांचे अभिनंदन करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

बिपाशाने पोस्टमध्ये लिहीलं की, “नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनीच नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच होतं. एकमेकांवरच फक्त खूप प्रेम करायचं हे थोडं अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.”

बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या सेलिब्रिटी कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद देखील दिसून येत आहे. शिवाय बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो विशेष लक्षवेधी आहे.