Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉसच्या घरात सगळ्यांना ‘गुलीगत धोका’ देणारा सूरज चव्हाण नेमका आहे तरी कोण? त्याचं शिक्षण किती? घ्या जाणून

WhatsApp Group

Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना ‘गुलीगत धोका’ देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. जाणून घ्या त्याच्याबद्दल सर्व माहिती.

Suraj Chavan

सूरजचं शिक्षण किती?

सूरज हा मूळचा बारामतीचा आहे. बारामतीतील मोरगाव शेजारील मोडवे या गावात तो राहतो. सुरजचा जन्म अत्यंत गरीब व छोट्या कुटुंबात झाला. अशातच लहानपणीच त्याच्या आई- वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. त्याचा स्वभाव फार भोळा व मृदू आहे. लहानपणापासून त्याने गरिबीत हलाखीचे दिवस पाहिले. त्यामुळे तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही. तो 8वी पर्यंतच शिकला. त्यानंतर तो मोलमजुरी करू लागला. एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला ‘टिक टॉक’ या ॲपबद्दल सांगितलं. त्यानंतर सुरजने बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला. आणि अचानक तो व्हायरलही झाला, त्याला प्रसिद्धी मिळू लागली. त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला व तो व्हिडिओ बनवू लागला. तो टिक टॉकवर प्रसिद्ध झाला.

Bigg Boss Winner Suraj Chavan

बुक्कीत टेंगुळ

भारतात ‘टिक टॉक’ बॅन झालं. त्यानंतर सूरजला युट्युबवरील ‘प्रेमासाठी काहीपण’ या सीरिजसाठी विचारणा झाली. त्यानंतर त्याने ‘बुक्कीत टेंगुळ’ हे व्हिडिओ केले. मागोमाग त्याला काही चित्रपटात काम करण्यासाठीही विचारणा झाली. आज सूरजचे युट्यूब व इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Suraj Chavan

सूरजला किती पैसे मिळाले?

बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर सूरजवर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजला बक्षीस स्वरूपात 14 लाख रूपयांचा चेक देण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रूपये जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्याला एक इलेक्ट्रीक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.

Bigg Boss Winner Suraj Chavan

सूरजने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली.