
सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये काम केलेली आणि बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री नेहा शितोळेची Neha Shitole सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नेहाच्या एका चाहतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेहाचंच एक सुंदर पोर्ट्रेट चित्र तिला भेट दिलं आहे. नेहा आपलंच सुंदर पोर्ट्रेट पाहून जाम खुश झाली आहे. हे चित्र तळकोकणातील प्रसिद्ध चित्रकार अक्षय सावंत यांनी काढलं आहे.
नेहा आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहीते की, “She finally met me… गेलं दीड वर्ष आमची चुकामूक होत होती… आज शेवटी भेटायचा योग आला… आज आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या ह्या नव्या मैत्रिणीच्या रूपाने रखुमाई च भेटली जणू… माझी माझ्या स्वतः शी पुन्हा ओळख करून देण्यासाठी… एका नवीन रुपात लवकरच तुमच्या समोर येणार आहे… तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या… हे चित्र काढलं आहे अक्षय सावंत यांनी”
View this post on Instagram
गुरूपौर्णिमाचे औचित्य साधून आपल्या पोर्ट्रेटसोबत एक फोटो टाकत नेहा म्हणते की,”हे वाचून खूप जण माझी टर उडवतील… मला उगाच काहीतरी स्टंट केला असं म्हणतील… काहींना त्यांचा राग काढायची अनायसा संधी मिळेल आणि ते शिव्या घालून मोकळे होतील… पण तरीही जेवढं आयुष्य जगलीये त्यानंतर स्वतः लाच गुरु पौर्णिमा, शिक्षक दिन किंवा तत्सम दिवसांच्या शुभेच्छा किंवा वंदन वगैरे करावं असं वाटतं… गमतीत नाही… उपहासाने तर अजिबात nahi… In all seriousness… आत्तापर्यंत जे काही ज्ञान मिळालं त्यातलं काय ठेवायचं आणि काय जाऊ द्यायचं हे स्वतः च स्वतः मी ठरवत आले… चुकांची शिक्षा स्वतः ची स्वतः ला करून ती भोगली… स्वतः स्वतः ला शाबासकी देऊन पुन्हा पुन्हा उभं केलं… मग कधीतरी हे acknowledge करायला नको? आज वाटतंय… So here is wishing myself a happy “गुरुपौर्णिमा”
View this post on Instagram