पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा जवळचा सहकारी सुभाष शंकर परबला Subhash Shankar Parab सीबीआयने अटक केली आहे. त्याला इजिप्तची राजधानी कैरो येथून अटक करून मुंबईत आणण्यात आले आहे. इंटरपोलने 2018 मध्ये सुभाष शंकर परब याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
सुभाष शंकर याने नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड्स कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम केले आहे. पीएनबीसोबत केलेल्या फसवणुकीतही त्याचा समावेश आहे असं सांगण्यात येत आहे. त्याअंतर्गत त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू होते, त्याला आता यश आले आहे.
त्याला मुंबईतून आणताच ताब्यात घेण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे. सीबीआयने 31 जानेवारी 2018 रोजी नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल केला होता. याशिवाय त्याची कंपनी फायरस्टार ग्रुप, भाऊ निशाल, काका मेहुल चोक्सी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nirav Modi’s close aide Subhash Shankar Parab deported from Egypt produced in Mumbai’s Special CBI Court in connection with the multi-crore Punjab National Bank (PNB) scam worth Rs 13,578 crores
CBI seeks 14 days of custody
— ANI (@ANI) April 12, 2022
एवढेच नाही तर कंपनीतील इतर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरव मोदीसह या लोकांवर पंजाब नॅशनल बँकेची 13,780 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने आपल्या तपासात सांगितले आहे की नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या कंपन्यांनी एकूण 20,600 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
2011 ते 2017 या कालावधीत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपन्यांना एकूण 23,780 कोटी रुपयांचे कर्ज जारी करण्यात आल्याचे एजन्सीने आपल्या तपासात म्हटले आहे. नीरव मोदीच्या जवळच्या मित्राला अटक करून त्याला मुंबईत आणणे हे एजन्सीचे मोठे यश मानले जात आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी अजूनही भारतीय एजन्सींच्या आवाक्याबाहेर असले तरी त्यांना भारतात प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.