रविवारी मुंबईत झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सांघिक आढावा बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात खेळाडूंच्या दुखापती हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. भारत या वर्षी ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक 2023 चे यजमानपद भूषवणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय आपल्या प्रमुख खेळाडूंना आयपीएल दरम्यान विश्रांती देऊ शकते. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
या बैठकीत भारतीय संघाच्या गेल्या वर्षाच्या (2022) कामगिरीचाही आढावा घेण्यात आला. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध मालिका पराभव आणि टी-20 विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीतील पराभव यावरही चर्चा झाली. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बोर्डाचे सचिव जय शाह, भारतीय कर्णधार रोहित शर्मा, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वरिष्ठ निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा हेही उपस्थित होते.
ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी रोडमॅप तसेच खेळाडूंची उपलब्धता, वर्कलोड मॅनेजमेंट आणि फिटनेस पॅरामीटर्स या मुद्द्यांवरही टीम आढावा बैठकीत तपशीलवार चर्चा करण्यात आली. याशिवाय काही नवीन शिफारशीही करण्यात आल्या. या बैठकीत खेळाडूंची उपलब्धता, वर्कलोड मॅनेजमेंट आणि फिटनेस पॅरामीटर्सवर चर्चा करण्यात आली. बीसीसीआयच्या आढावा बैठकीत भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यापूर्वी युवा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक वेळ द्यावा लागेल, असा निर्णयही घेण्यात आला. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंना निवड होण्यापूर्वी यो-यो चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. यो यो चाचणी संघपूर्व निवडीचा भाग असेल.
BCCI ने विश्वचषक 2023 साठी 20 खेळाडूंची निवड केली आहे. मात्र, त्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. जय शाह म्हणाले, “असे 20 खेळाडू आहेत ज्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. एकदिवसीय विश्वचषकासाठी निवडलेल्या खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापनाबाबत NCA आयपीएल फ्रँचायझी संघांसोबत काम करेल.