लाखो तरुणांना मोठा धक्का; राज्यातील पोलीस भरती पुढे ढकलली

WhatsApp Group

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर केलेली. ही पोलीस भरती येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार होती. पण पोलीस भरती जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या भरतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती आता पुढे ढकलण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय कारणामुळे ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. या भरतीची नवी जाहीरात लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

राज्यात पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागा  लक्षात घेता, पोलीस भरतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. पोलिस दलातील विविध जिल्ह्यातील तब्बल 14 हजार 956 जागांसाठी ही भरती होणार होती. मात्र आता ही पोलिस भरती लांबणीवर पडली आहे.