प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का! 7 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

WhatsApp Group

सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुकेश चंद्रशेखर विरुद्ध खंडणी प्रकरणामध्ये जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जॅकलीन फर्नांडिस यांच्या अंतर्गत 7.12 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा समावेश आहे.

सुकेशने जॅकलिनला 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने जॅकलिनच्या जवळच्या कुटुंबीयांना US डॉलर 173,000 आणि जवळपास 27,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा निधीही (Funds) दिला होता.

सुकेश सध्या पाच वर्षे जुन्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये अडकलेला आहे. 4 एप्रिल रोजी त्याला ईडीने या प्रकरणात अटक केली होती. तर, गेल्या वर्षी, गृह मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून दिल्लीमधील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी सुकेशला ईडीने अटक केली होती.