अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; शरद पवार गटात जाणार ?

0
WhatsApp Group

महाविकास आघाडीकडून बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून ज्यांचे नाव चर्चेत आहे. त्या बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे. यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली होती. याशिवाय जिल्हा परिषदचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. यासह कारखानदारीमध्ये देखील त्यांचे नाव आहे. यामुळे त्यांचे नाव विविध क्षेत्रात देखील घेतलं जाते. दरम्यान बजरंग सोनवणे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.