अजित पवार गटाला मोठा धक्का! 137 जणांनी दिला राजीनामा

WhatsApp Group

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणावळ्यात अजित पवार गटाचे महत्त्वाच्या नेत्यांसह तब्बल 137 जणांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारची घटना घडल्याने अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे.

लोणवळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार गटात) राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह 137 जणांनी राजीनामा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिलाय.