IPL 2024: आरसीबी संघाल मोठा धक्का, हा खेळाडू होऊ शकतो बाहेर

WhatsApp Group

आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 7 विकेट्सने पराभव केला. आरसीबीचा हा सलग चौथा पराभव आहे. सामन्यादरम्यान आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल जखमी झाला. अशा स्थितीत तो पुढील सामन्यातून बाहेर पडू शकतो. आरसीबीचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना 15 एप्रिलला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.

ग्लेन मॅक्सवेलला गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना झेल घेताना अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. मुंबईच्या डावातील 11वे षटक आकाशदीपने टाकले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने जोरदार फटका मारला. मॅक्सवेल ने दोन्ही हातांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आपल्या यशस्वी होऊ शकला नाही आणि चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला. मॅक्सवेलला खूप वेदना होत असल्याचे दिसून आले आणि तो मैदानाबाहेर गेला.

आयपीएल 2024 मध्ये मॅक्सवेलची आतापर्यंतची कामगिरी काही खास राहिलेली नाही. त्याने 6 सामन्यात 5.33 च्या सरासरीने आणि 94.11 च्या स्ट्राईक रेटने 32 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 28 आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. यासह, तो लीगमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक वेळा गोल्डन डकचा बळी ठरलेला फलंदाज बनला.