औरंगजेबासंदर्भातील स्टेटसमुळे कोल्हापुरात मोठा राडा; मुख्यमंत्री म्हणाले..

WhatsApp Group

औरंगजेबाच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अहमदनगरहून सरकत हा तणाव आता कोल्हापुरात पोहोचला आहे. येथे मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. येथे परिस्थिती अशा प्रकारे अनियंत्रित झाली की, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेसमोर शांततेचे आवाहन करावे लागले. कोल्हापुरातील काही लोकांनी आपल्या मोबाईलवर औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस पोस्ट केल्याचे बोलले जात आहे.

यानंतर काही हिंदू संघटना विरोधात उभ्या राहिल्या. यादरम्यान हिंदू संघटनांनी आक्षेपार्ह पोस्ट शेअर करून कारवाईची मागणी केली. यासोबतच कोल्हापूर बंदची हाक दिली. बंददरम्यान आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आले, त्यानंतर दगडफेक सुरू झाली.

ही स्थिती अनेक भागात दिसू लागली. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कारवाई सुरू केली. या गोंधळावर तात्काळ नियंत्रण ठेवण्याचे आदेश महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने दिले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलली पाहिजेत. हजारो हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या. ही वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. दोषींना कठोर शिक्षा होईल असंही ते म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी, काही मुस्लिम तरुणांनी औरंगजेबाचे वादग्रस्त व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट केल्याने मोठा गोंधळ झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. याच्या निषेधार्थ आज हिंदू संघटनांनी कोल्हापुरात बंदची घोषणा केली होती. या प्रकरणावर भाष्य करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेबाबत जे तथ्य समोर आले आहे. त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.