
जालन्यामध्ये (Jalna) आज प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax) मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने (Income Tax Department,) जालना (Jalna) येथील एका स्टील कारखानदाराचे कारखाने आणि इतर मालमत्तांवर छापेमारी केली. या वेळी केलेल्या कारवाईत बेहिशोबी मालमत्तांचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित कारखानदाराकडून तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती आणि जवळपास 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्ता समोर आल्या आहेत.
आयकर विभाग कागदपत्रे आणि इतर बाबींची अद्यापही पडताळणी करत आहेत. दरम्यान, कारवाई केलेल्या कारखानदाराचे नाव आयकर विभागाने अद्याप जाहीर केले नाही. ही कारवाई अद्यापही सुरु आहे. आयकर विभागाला संशय आहे की, या कारखानदाराचा काळा पैसा औरंगाबाद येथील एक प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापारी गुंतवणूक करुन करत आहे. याबाबतही शोधमोहिम सुरु आहे.
The Income Tax Department has seized cash and valuables worth Rs 390 crore following a raid on the premises of #Maharashtra‘s Jalna businessman, who deals in garments, real estate and in steel.@IncomeTaxIndia pic.twitter.com/XgAms8IK8W
— IANS (@ians_india) August 11, 2022
जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने 1 ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यामध्ये पोहोचले होते. ही सर्वात मोठी कारवाई असून प्राप्तिकर विभागाकडून अजूनही तपास सुरु आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.