मोठी बातमी! शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

WhatsApp Group

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होणार आहेत. त्यानंतर 2 नोव्हेंबरला संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते 3 नोव्हेंबरला शिर्डीला जाणार आहेत. जिथे ते 4 आणि 5 नोव्हेंबरला होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना रुग्णालयाबाहेर जमू नये आणि गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्राद्वारे शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील तीन दिवस रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्यावर ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. 2 नोव्हेंबरला रुग्णालयातून सोडल्यानंतर ते 3 नोव्हेंबरला शिर्डीला जाणार आहेत. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय पक्ष शिबिरात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना रुग्णालयाभोवती जमू नये आणि गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र, शरद पवारांना काय त्रास होतोय याचा खुलासा पत्रात करण्यात आलेला नाही. रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान शरद पवार हे तीन दिवस कुटुंबियांशिवाय कोणाला भेटणार नाहीत.