
सरकारी कामं असो किंवा शाळेचा फॉर्म या सगळ्या गोष्टी आवर्जून या साईटवरून भरल्या जायच्या. जेव्हा क्रोम आणि गुगलही आले नव्हते अगदी तेव्हापासून सुरू असलेली ही इंटरनेटवरील सेवा तब्बल 27 वर्षांनी आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा या साईटवरून कोणत्याही गोष्टी शोधायला जायचे तेव्हा लोड होण्यासाठी फार पेशन्स लागत होते.
तब्बल 27 वर्षांचा हा प्रवास आता थांबला आहे. कधी स्लो साईटमुळे तर कधी सरकारी कामांमुळे तर कधी सर्च इंजिन म्हणून सतत चर्चेत असलेली इंटरनेट एक्स्प्लोरर (Microsoft Internet Explorer) ही सेवा आता बंद होणार आहे.
इंटरनेट एक्स्प्लोरर 15 जूनपासून बंद होणार आहे. 1995 पासून सुरू झालेला प्रवास आता 15 जूनला थांबणार आहे. मोबाईल असो किंवा कंप्यूटर-लॅपटॉप दोन्ही ठिकाणून ही सेवा आता बंद होणार आहे. गुगल-क्रोम, मोझिला फायरफॉक्स सारख्या ब्राउझरमुळे इंटरनेट एक्स्प्लोरर वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक कमी होत गेली. मायक्रोसॉफ्टने याकडे लक्ष देण्याऐवजी मायक्रोसॉफ्ट एज नवीन ब्राउझर लाँच केले. त्यामुळे आता इंटरनेट एक्स्प्लोरर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.