SSC HSC Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षेत केले हे 6 मोठे बदल

WhatsApp Group

दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ आता रद्द करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

परीक्षेत केले हे मोठे बदल

  • 2023 मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे.
  • यावर्षी होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही.
  • 80  गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही.
  • 60-40 गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
  • यंदा 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. ( गेल्यावेळी 25% अभ्यासक्रम वगळला होता)
  • दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.