मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

0
WhatsApp Group

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच आहे. शनिवारी (10 जून) पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हज यात्रेसाठी निघालेल्या छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने निघालेल्या कारचा वैजापूरजवळ अचानक टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि अपघात घडला.

या भीषण अपघातात 1 वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला. तर कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.