धक्कादायक! टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याआधीच मोठी बातमी, क्रिकेटपटुची घरात घुसून हत्या

WhatsApp Group

भारत आणि श्रीलंकेदरम्यान टी-20 आणि एकिदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल. पण त्याआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची त्याच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुंडांनी त्याच्या पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या झाडून हत्या केली.

काय आहे नेमकी घटना
हत्या करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेटरचं नाव धम्मिका निरोशन (Dhammika Niroshan) असं होतं. धम्मिका हा श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा माजी कर्णधार होता. धम्मिका हा 41 वर्षांचा होता आणि मंगळवारी म्हणजे 16 जुलैला त्याची हत्या करण्यात आली. धम्मिका हा अंबालांगोडा इथल्या मावथा इथं आपल्या कुटुंबासोबत राहातो. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार घटना घडली त्या दिवशी धम्मिका, त्याची पत्नी आणि दोन मुलं घरीच होती. सकाळच्या सुमारात बंदुकधारी व्यक्ती त्यांच्या घरात घुसला आणि धम्मिकावर अंदाधुंद गोळीबार केला. यात धम्मिकाचा जागीच मृत्यू झाला.

धम्मिका निरोशनने 2001 ते 2004 या कालावधीत गॅले क्रिकेट क्लबसाठी 12 प्रथम श्रेणी सामने आणि 8 लिस्ट-ए खेळ खेळले, 300 हून अधिक धावा केल्या आणि 19 बळी घेतले. सन 2000 मध्ये श्रीलंकेच्या अंडर 19 संघासाठी पदार्पण करून, त्यांनी दोन वर्षे अंडर-19 कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भाग घेतला. निरोशानाने 10 सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या अंडर 19 संघाचे नेतृत्व देखील केले, फरवीझ महारूफ, अँजेलो मॅथ्यूज आणि उपुल थरंगा यांसारखे त्यावेळचे आघाडीचे खेळाडू, ज्यांनी पुढे श्रीलंकेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले. डिसेंबर 2004 मध्ये निरोशानाने शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळला.