मुंबईकरांसाठी खुशखबर: एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात

WhatsApp Group

मुंबई : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरामध्ये ५० टक्क्यांनी कपात करत असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे.

विविध स्तरातील लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेत असल्याचं रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितलं आहे. ऐन उन्हाळ्यात सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

‘वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरामध्ये किती कपात करायला हवी, असं आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होतं ३० टक्क्यांनी दर कमी करा, तर कोणी म्हणत होतं २० टक्क्यांनी दर कमी करा. मात्र देशाचे पंतप्रधान हे नेहमी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्हीही सामान्य माणसासाठी निर्णय घेत वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरामध्ये ५० टक्क्यांची कपात करत आहोत,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.