मुंबई – महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे ( Big increase in salaries of ST employees ). एसटी कर्मचारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर अनिल परब उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. त्यावेळी अजित पवारांनी पगारवाढीसाठी मान्यता दिल्यानंतर परब अंतिम प्रस्तावासाठी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. यांनतर परबांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे जाहीर केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रुपयांपर्यंत वाढ
- १ ते १० वर्ष श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ५ हजारांची वाढ करण्यात आली असून सर्व भत्यांसह आता त्याच्या पगारात ७ हजार २०० रुपयांपर्यंत वाढ होईल.
- १० ते २० वर्ष श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ४ हजारांची वाढ करण्यात आली असून सर्व भत्यांसह आता त्याच्या पगारात ५ हजार ७६० रुपयांपर्यंत वाढ होईल.
- ज्या कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षांहून अधिक आहे अशा कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात २ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून सर्व भत्यांसह आता त्याच्या पगारात ३ हजार ६०० रुपयांपर्यंत वाढ होईल.
- ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ३० वर्षा किंवा त्याहून अधिक आहे अशा कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात २ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून सर्व भत्यांसह आता त्याच्या पगारात ३ हजार ६०० रुपयांपर्यंत वाढ होईल.
या पगार वाढीमूळे राज्य सरकारवर आणि एसटी महामंडळावर वर्षाला ६०० कोटींचा भार येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक मोठं पाऊल उचलल आहे. या संपामुळे आतापर्यंत ३,०५२ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून ६४५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र हे कर्मचारी राज्य सरकारने सांगितलेल्या वेळेवर कामावर परत रूजु झाल्यास या सर्वांना परत सेवेत सामावुन घेण्यात येईल असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.