
धारा ब्रँडच्या नावाने खाद्यतेल (Edible Oil) विकणारी सहकारी कंपनी मदर डेअरीने (Mother Dairy) सोयाबीन,मोहरी आणि सुर्यफूलाच्या तेलाच्या दरामध्ये कपात आहे. यासोबतच इतर ब्रँडेड तेल कंपन्याही आपापल्या ब्रँडच्या किंमती कमी करणार आहेत. त्यामुळे महगाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘धारा’ या ब्रँड नावाने खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी या सहकारी कंपनीने मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी कपात केली आहे. यासोबतच इतर ब्रँडेड तेल कंपन्याही आपापल्या ब्रँडच्या किमती कमी करणार आहेत.
तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम ग्राहकांपर्यंत लगेच पोहोचण्यास सुरुवात होईल. सध्या पामतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते ८ रुपयांनी घसरण झाली आहे. तर सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या दरात प्रतिलिटर १० ते १५ रुपयांनी घट झाली आहे. त्याचवेळी, सोयाबीन तेल 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे.