खूशखबर; खाद्य तेलांच्या दरात मोठी घसरण

WhatsApp Group

महागाईबाबत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यानंतर आता आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. आता कच्च्या घाणीच्या तेलात मोठी घसरण झाली आहे. इंडोनेशियाने निर्यात पुन्हा सुरू केल्यामुळे किमतीत घट झाली आहे.

परदेशी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या दरात वाढ होत असताना, इंडोनेशियातून निर्यात सुरू झाल्याचा परिणाम देशाच्या बाजारपेठेवर झाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये बहुतांश तेल-तेलबियांच्या किमतीत घसरण दिसून आली. परिणामी मोहरीचे तेल 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाच्या दरातील ही मोठी घसरण मानली जात आहे.