बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का; हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन केली हकालपट्टी

WhatsApp Group

महाविकास आघाडी मधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली काही अपक्षांच्या मदतीने त्यांनी विधिमंडळातील शिवसेनेमध्ये फूट पाडली आहे. सध्या शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांविरूद्ध अपात्रतेची कारवाई न्यायप्रविष्ट असताना पक्षात मात्र त्यांच्याविरूद्धच्या कारवाई करायला सुरूवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.

संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार तसेच जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. संतोष बांगर यांनी बंडाच्या सुरुवातीच्या दिवसांत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती.

संतोष बांगर यांनी शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं होते. त्यांनी मराठवाड्यामध्ये रस्त्यावर उतरून बंडखोरांचा निषेधही केला होता. ढसाढसा रडत शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केले होते मात्र काही तासांतच चित्र पालटलं आणि बांगर देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले.