Baba Ramdev Products: रामदेव बाबा यांना मोठा झटका, पतंजलीच्या 14 उत्पादनांवर घातली बंदी

0
WhatsApp Group

Patanjali Products Licence Cancel: सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर उत्तराखंड सरकारने बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसी कंपनीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली आहे. यामध्ये खोकल्यावरील औषध आणि अनेक प्रकारच्या गोळ्यांचा समावेश आहे. उत्तराखंड सरकारच्या परवाना प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशात पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसीच्या वतीने उत्पादनांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत धामी सरकारने सोमवारी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले. पतंजलीच्या काही उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पतंजलीला फटकारले होते.

रामदेव बाबा यांच्यावर अवमानाचा गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी पतंजली प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उत्पादनांवरील बंदीबाबत पतंजलीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

या उत्पादनांवर बंदी 
उत्तराखंड औषध नियंत्रण विभागाच्या परवाना प्राधिकरणाने बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या दिव्या फार्मसी कंपनीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी दिव्या फार्मसीच्या या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.

पतंजली दृष्टी आय ड्रॉप, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, लिवामृत एडवांस, लिवोग्रिट, आईिग्रट गोल्ड, ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेहा आणि श्वासारि गोल्ड, श्वासारि वटीचा समावेश आहे.