कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का, पॅट कमिन्स आयपीएलमधून पडला बाहेर

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मोसमातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार कमिन्स लवकरच मायदेशी परतणार आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट वेबसाइट cricket.com.au ने याबाबत माहिती दिली आहे. किरकोळ दुखापतीमुळे पॅट कमिन्सने आयपीएलमधून विश्रांती घेतली आहे. त्याची दुखापत फारशी गंभीर नाही, त्यामुळे तो लवकरच बरा होईल. पुढील श्रीलंका दौऱ्यापूर्वी तो बरा होण्याची अपेक्षा आहे.

आयपीएलच्या या मोसमात पॅट कमिन्सने फक्त 5 सामने खेळले आणि यातं त्याने 7 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान कमिन्सने दमदार फलंदाजी देखील केली होती. कमिन्सला कोलकाता फ्रँचायझीने मेगा लिलावात 7.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र तो आता संघातून बाहेर पडला आहे त्यामुळे कोलकाता संघासाठी हा मोठा धक्का आहे.